Saturday, June 14, 2025

आयसीसी पुरस्कार जिंकणारी 'हरमनप्रीत कौर' ठरली पहिली भारतीय

आयसीसी पुरस्कार जिंकणारी 'हरमनप्रीत कौर' ठरली पहिली भारतीय

नवी दिल्ली : आयसीसीने सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारात दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारावरही भारताचे वर्चस्व आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड' हा सन्मान देण्यात आला आहे. आयसीसी पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.


Luxion KeyShot Pro Crack

महिलांमध्ये हरमनप्रीतचा सामना भारताच्या स्मृती मानधना आणि बांगलादेशच्या निगार सुलतानाशी होता. निवडलेल्या तीनही खेळाडूंनी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या हरमनप्रीत आणि मंधाना यांनी गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका गमावली असली तरी वनडे मालिकेत इंग्लंडचा सफाया केला.


हरमनप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने २२१ च्या सरासरीने २२१ धावा केल्या आणि ती सर्वाधिक धावा करणारी ठरली. हरमनने पहिल्या सामन्यात नाबाद ७४ आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद १४३ धावा केल्या. यामुळे भारताने १९९९ नंतर इंग्लंडमध्ये पहिली वनडे मालिका जिंकली.

Comments
Add Comment