Sunday, July 6, 2025

मूसेवालाच्या हत्येप्रकरणी फरार गुंडांच्या गर्लफ्रेंडला मुंबई विमानतळावरून अटक

मूसेवालाच्या हत्येप्रकरणी फरार गुंडांच्या गर्लफ्रेंडला मुंबई विमानतळावरून अटक

मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी फरार गुंड दीपक टिनूच्या प्रेयसीला मुंबई विमानतळावरून पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. जितंदर कौर उर्फ ​​ज्योती देओल, असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती मुंबईहून मालदीवला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार दीपक टीनू १ ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता.


या संदर्भात डीजीपी गौरव यादव यांनी ट्विट केले की, पंजाब पोलिस आणि एजीटीएफने गुप्त माहितीच्या आधारे मुंबई विमानतळावरून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या गँगस्टर दीपक टिनूच्या महिला साथीदाराला अटक केली आहे. टिनूला अटक करण्यासाठी तपास सुरू आहे. अटकेनंतर आरोपी जसप्रीत कौर उर्फ ​​ज्योतीला पोलिसांनी मानसा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १४ ऑक्टोबरला तिला पुन्हा हजर केले जाणार आहे. गुंड


मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला आरोपी लुधियाना जिल्ह्यातील खंडूर गावची रहिवासी आहे. रविवारी सायंकाळी तीच्या खंडूर गावातल्या घरावरही मानसा पोलिसांनी छापा टाकला. गुंड दीपक टिनूला पळून नेण्यात आरोपी ज्योतीची महत्त्वाची भूमिका होती. सुमारे एक आठवड्यापूर्वी गुंड दीपक टिनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता, जो अद्याप सापडलेला नाही.

Comments
Add Comment