नवी दिल्ली : मुलायम सिंह यादव यांचं सोमवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राम येथे मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते.
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मी मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह यादव यांच्याशी माझा अनेक वेळा संबंध आला. मी नेहमीच त्यांची मते ऐकण्यासाठी उत्सुक असायचो. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.’
I had many interactions with Mulayam Singh Yadav Ji when we served as Chief Ministers of our respective states. The close association continued and I always looked forward to hearing his views. His demise pains me. Condolences to his family and lakhs of supporters. Om Shanti. pic.twitter.com/eWbJYoNfzU
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2022
एकनाथ शिंदे यांनी मुलायम सिंग यादव यांना श्रद्धांजली
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले.उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे मोठे योगदान आहे. मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना, असे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलायम सिंग यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री व समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. उत्तर प्रदेश च्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे खूप मोठे योगदान आहे.मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022
शरद पवार यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी मुलायम सिंह यांच्या निधानवर शोक व्यक्त करत म्हटले आहे की, लोहियांच्या विचारसरणीवर मुलायम सिंह यादव यांनी राजकीय वाटचाल केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणातही लक्ष दिले. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. सगळ्या विरोधकांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने वैयक्तिक नुकसानही झाले आहे. देशातील समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Saddened to hear about the demise of Former CM of UP, former Defence Minister of India & Patriarch of Samajwadi Party Mulayam Singh Yadav ji. He gave a strong ideology to Samajwadi Party to stand strong against communal forces & worked towards creating a socialist society. pic.twitter.com/HgrsPNFZqu
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 10, 2022