Saturday, October 5, 2024
Homeसाप्ताहिककोलाजद्वेष करी अंत

द्वेष करी अंत

अॅड. रिया करंजकर

राग, लोभ, प्रेम, द्वेष हे प्रत्येक माणसांमध्ये कमी अधिक प्रमाणात गुण आढळून येतात. केव्हा केव्हा या गुणांचा अतिरेक होऊन माणसांना विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. हे गुण माणसांमध्ये जन्मजात किंवा घरातील असलेल्या वातावरणामुळे आपसूकच माणसांमध्ये निर्माण होतात. काही वेळा घरची परिस्थिती अशी असते की, माणूस या गुणांच्या आहारी गेलेला असतो.

द्वेष हा असा गुण आहे की, माणूस स्वतःचा तरी द्वेष करतो किंवा दुसऱ्याचा द्वेष करतो. परिस्थितीमुळे माणूस दुसऱ्यांचा द्वेष करायला लागतो. ईशान हा शाळेतील हुशार मुलगा पहिल्या पाचमध्ये येणारा मुलगा इयत्ता नववीमध्ये शिकत होता. अभ्यासतच नाही, तर इतर शालेय उपक्रमामध्येही तो पुढेच असायचा. त्याचप्रमाणे त्याचा स्वभाव प्रेमळ असा होता. अभ्यासात तर हुशार होताच आणि प्रेमळ स्वभावामुळे त्याच्या अवतीभवती मित्र-मैत्रिणींचा नेहमीच घोळका असायचा कारण त्याच्या स्वभावामुळे तो सतत इतरांना मदत करत असायचा आणि मित्र-मैत्रिणींना तो अभ्यासाबाबत नोट्सबाबत कधी नाही बोलायचं नाही. अभ्यासाबाबत एखादी गोष्ट एखाद्या मित्राला समजली नाही, तर ईशान समोरच्या मित्राला समजेपर्यंत समजवायचा. त्याच्याच वर्गातला आदित्य हा त्याच्या शेजारी राहणारा त्याचा मित्र होता. दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते. दोघांचे आई-वडील एकामेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. आदित्य हा अभ्यासात कमजोर होता तसा तो शालेय उपक्रमातील सहसा भाग घेत नसेल त्याचं लक्ष अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या खोड्या काढणं टावाळकरीकरण शिक्षक शिकवताना मिमिक्री करणे अशा पद्धतीचा आदित्य होता. त्याचे एकच उद्दिष्ट असायचं की, सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे असावं. यासाठी तो विचित्र गोष्टी करण्यात याचा प्रयत्न करायचा की, ज्यामुळे सगळ्या वर्गाचं माझ्याकडे लक्ष जाईल, पण तो या ज्या गोष्टी करत होता, त्यांचा इतर मुलांना त्रास व्हायचा. त्यामुळे इतर मुलं त्याला वाया गेलेला मुलगा असं समजायचे. मुलंच नाही, तर तो शाळेमध्ये वाया गेलेला मुलगा असाच होता. त्याचप्रमाणे राहत असलेल्या सोसायटीमध्ये तो बिघडलेला मुलगा म्हणूनच लोक त्याच्याकडे पाहत होती. आदित्य नेहमी ईशानचा द्वेष करायचा. कारण ईशान त्याच्या सोसायटीमध्ये राहायला होता आणि त्याच्याच वर्गामध्ये होता. सोसायटीतील लोक नेहमी ईशानबरोबर आदित्याची कम्पॅरिंग करायची. ईशान कसा आणि तू कसा दोघेही लहानाचे मोठे एकत्र झालेले, एकत्रच खेळलेले, शाळेतही शिक्षक नेहमी आदित्यला ओरडायचे आणि ईशान्य कसा अभ्यास करतो तू का नाही करत, असे त्याला नेहमी ओरडायचे त्यामुळे लहानपणीच्या मैत्रीचं रूपांतर द्वेषमध्ये झालं. आदित्य लहानपणी असा नव्हता पण त्याच्या अशा वागण्याला कारणीभूत ठरत होती. त्याची घरची परिस्थिती आई-वडिलांची सतत भांडणं त्या भांडणांमध्ये आई-वडील आपल्या मुलांकडे लक्ष देत नव्हते. आई-वडिलांच्या भांडणाचा पूर्ण राग आई-वडील आदित्य आणि त्याच्या बहिणीवर काढत असत. शाळेमध्ये तू काय करतोयस, तुझा अभ्यास कसा चाललाय किंवा त्यांचा अभ्यास घेणे त्यांना समजावून हे आदित्यच्या आई-वडिलांनी कधीच केलं नाही. आई-वडिलांचा द्वेष करता करता आदित्य स्वतःबरोबर आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींचाही द्वेष करू लागला. शाळेमध्ये मधल्या सुट्टीत व इतर वेळेत काही कारण नसताना ईशानला नको ते शब्द आदित्य वापरू लागला. इतर मित्रांमध्ये ईशानची लायकी कशी निघेल हे सतत आदित्य करू लागला. तो किती वाईट आहे आणि आपण किती चांगले आहोत. हे दाखवण्याचा आटोक्यात प्रयत्न करू लागला. ईशान हुशार असला तरी तू किती बावळट आहे आणि मी किती डॅशिंग आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न तो आपल्या आजूबाजूला करत असे.

एक दिवस मधल्या सुट्टीमध्ये काही मित्र ईशानला अभ्यासाबद्दल असलेला प्रॉब्लेम विचारायला आले आणि ईशान त्यांना समजावू लागला, पण या मित्रांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित झालं पाहिजे यासाठी अनेक युक्त्या पाठीमागे बसलेला आदित्य करू लागला, पण इतर मित्रांना आदित्य कसा आहे, हे चांगल्या प्रकारे माहीत होतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता ते ईशान समजवत असलेल्या गोष्टीकडे देऊ लागले. याचा राग आदित्यला आला आणि त्याने मागच्या बेंचवरून पुढे बसलेल्या ईशानच डोकं डेक्सवर जोरात आपटलं. रागाच्या भरात त्याने ईशानची मान पकडली होती आणि जोरजोरात तो डेक्सवर त्याचं डोकं आपटत होता. इतर मित्र त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कोणालाच ऐकत नव्हता. ही गोष्ट शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचली. मुख्याध्यापक वर्गात येईपर्यंत तो इशांतचं डोकं आपटत होता. शिक्षकांनी कसंबसं त्याला त्यातून सोडवलं, पण तोपर्यंत ईशान निप्चित पडलेला होता आणि यातच ईशानचा मृत्यू झाला.

इतर लोकांबरोबर केलेली तुलना ही माणसांच्या मनात द्वेष निर्माण करते, तसं नाही तर त्या द्वेषमध्ये एखाद्याचा अंतही होतो. जसा ईशानचा झालेला होता. स्वतःबद्दल असलेला द्वेष आई-वडिलांबद्दल असलेला द्वेष आज आदित्यने ईशानवर काढला. या द्वेषमुळे आपण काय करतो याचं भानही आदित्यला राहिलं नाही. हा द्वेष ईशांनचा जीव घेऊन गेला, तर ईशानचा जीव घेतला म्हणून आदित्यला तुरुंगवास भोगावा लागला, हा द्वेष दोन जीवांचा आयुष्य बरबाद करून गेला.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -