नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावताच शेफाली वर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत. १८ वर्षे २५३ दिवसांत हा मोठा टप्पा गाठला आहे. यासह ती टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. आपल्याच देशाच्या जेमिमा रॉड्रिग्जला मागे सोडले. वयाच्या २१ वर्षे ३२ दिवसात १००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.
शेफाली वर्माच्या अर्धशतकामुळे भारताने ठेवलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ७ बाद १०० धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सामना ५९ धावांनी जिंकून आशिया कपमध्ये आपली गाडी पुन्हा विजयीपथावर नेली.
भारताकडून शेफालीशिवाय स्मृती मानधनाने ४७ धावा, जेमिमा रॉड्रिग्जने ३५ धावा केल्या. यानंतर बांगलादेशचे क्रिकेटपटू भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्माने २-२ विकेट घेतल्या. त्याचवेळी रेणुका सिंग आणि स्नेहा राणा यांनी १-१ विकेट घेतली