Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडी'आदिपुरुष' चित्रपटाविरुद्ध दिल्ली न्यायालयात याचिका; १० ऑक्टोबरला होणार सुनावणी 

‘आदिपुरुष’ चित्रपटाविरुद्ध दिल्ली न्यायालयात याचिका; १० ऑक्टोबरला होणार सुनावणी 

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध सैफ अली खान आणि अभिनेता प्रभास ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या टीझरवर टीका केली. काहींनी या टीझरमधील सैफच्या लूकवर टीका केली तर काहींनी टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या वीएफएक्स वर आक्षेप घेतला. आता आदिपुरषचा हा वाद दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयापर्यंत पोहचला आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, यूट्यूबसह इंटरनेट मीडियाला चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आणि टीझरमधून आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटात भगवान राम आणि हनुमानाची पात्रे चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही याचिकाकर्ते राज गौरव यांचे मत आहे.

यासोबतच या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणावर सोमवारी सकाळी १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रामायणासारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरूपाची छेडछाड करता येणार नाही. रामायण हा भारताच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि आध्यात्मिक आणि धर्माचा भाग आहे. ते म्हणाले की, भगवान रामाची प्रतिमा शांत होती, तर आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरमध्ये ते अत्याचारी, प्रतिशोधी आणि संतप्त व्यक्ती म्हणून दाखवले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -