Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआरोग्यासाठी काळ, काम, वेगाचे गणित

आरोग्यासाठी काळ, काम, वेगाचे गणित

डॉ. लीना राजवाडे

सुखसंज्ञकं आरोग्यं अशी आरोग्याची व्याख्या आपण पाहिली. मग हे “आरोग्यपूर्ण आयुष्य” नेमकं कसं संपादन करता येईल? नव्हे जन्माला आल्यानंतर मी सुखी असावं, ही प्रत्येक मनुष्याची स्वाभाविक इच्छा असतेच. यासाठीच तर आपण धडपडत असतो. यात आपण वाचक म्हणून सगळेच संमत असाल. आजचा लेख लिहिण्यामागचा माझा हेतू या आरोग्यरूपी धनसंपदेशी नेमके काय विषय निगडीत असतात, हे समजून घेतले पाहिजे, हे सांगण्याचा आहे.

गेली अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रकारच्या समस्या घेऊन, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांशी आरोग्यासाठी वैद्यकीय उपचार देताना असे लक्षात आले की, काही गोष्टी लवकर बऱ्या होतात, काही खूप वेळ घेतात, तर काही कितीही प्रयत्न करा अनारोग्याचे गणित सुटतच नाही. याबाबतीत विचार सुरू झाला आणि लक्षात आले, दुर्लक्ष झाले आहे ते आरोग्य आणि काळ काम वेगाचे गणित यांच्या संबंधाकडे.

सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर आपली तब्येत योग्य वेळी, योग्य प्रकारांनी, योग्य गतीने किंवा पद्धतीने सांभाळण्यासाठी प्रयत्न करत राहिलो, तर अनारोग्यातून लवकर मोकळे होऊ शकतो. म्हणजेच आरोग्याचे गणित लवकर सुटू शकते. आपण शाळेत असताना काळ काम वेगाची गणिते सोडवत असू. त्याचीही थोडी उजळणी या निमित्ताने करूयात. वास्तविक पाहता हा गणित विषय, त्याचा आरोग्याशी काय संबंध असे मनात येणे स्वाभाविक आहे. तेच समजावून घेण्याचा माझाही या लेखाच्या निमित्ताने प्रयत्न आहे.

नुकतीच ५-जी प्रणाली कार्यान्वित होणार ही बातमी मा‍झ्या वाचनात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे प्रगत होते आहे. १९७९ साली १-जी या मोबाइल प्रणालीने झालेली सुरुवात आज ५-जी पर्यंत पोहोचलीय. किती वेगवान प्रगती आहे ही. यासोबतच, याचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? यावरही संशोधन चालू आहे. तो समजून घेऊयात. ५-जी या प्रणालीचा आजमितीला फायदा हा की, रोबोटिक सर्जरी ते कृत्रिम बुद्धिमत्ता याच्या मदतीने अवयव प्रत्यारोपण असेल, जगात कुठूनही कुठेही ते करता येईल. यानी नेमके जिवंत शरीराला पर्यायाने त्याचे अनारोग्य दूर होईल कदाचित. पण आरोग्य मिळेल का?, विचार करण्याची गोष्ट आहे. नुकतेच वाचनात आले की, ५-जी लवकरच कार्यान्वित होणार. तंत्रज्ञानात होणारी वेगवान प्रगती मानवाला सुख देण्यासाठी आहे. याच प्रणालीचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का, यावरही संशोधन करणारे ९४ relevant research paper प्रकाशित झाले आहेत. ज्यात invitro investigations, biological cellular level वर परिणाम झाला का? हे शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यात असे लक्षात आले की, ८० टक्के प्रतिसाद मिळतो. ५८ टक्के कोणत्या ना कोणत्या पद्धतीने परिणाम घडून येतात आणि निष्कर्षही काढले गेले, जे eye opener आहेत. निष्कर्षापैकी प्रमुख दोन मुद्दे या ठिकाणी मांडते.

१ – wireless communication – high frequency power – based stations and other devices do cause impact on physiological, neurological, histological changes in vitro studies. It also shows protein expression, cytotoxic effect, genotoxic changes, and temperature related reactions.

२ – ही प्रणाली वापरताना सुरक्षेसाठी काय उपाययोजना करायला हवी यासाठी अजून पुरेशी माहिती नाही. ती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी छोट्या भागावर जसे त्वचा, डोळे यावर परिणाम होतो का, हे पाहिले पाहिजे. तिथे उष्णता निर्माण होते का, हे पाहिले पाहिजे. शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा,

Our quality analysis shows that for future studies to be useful for safety assurance
design and implementation need to be significantly improved.

आजपासून पुढील पंचवीस वर्षांत हे गणित नेमके कसे असेल? यासाठी काय करायला हवे? पुढीलपैकी काही पर्यायांचा विचार
करता येईल.

वेळीच कायदा गतीचा नव्हे, तर गतीला कायद्याचे पालन करायला हवे. नव्हे ती सवय लावून घ्यायला हवी.

सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वा प्रवृत्तयः।
सुखंच न विना धर्मात्तस्माद्
धर्मपरो भवेत्।।

हा लेख वाचणारे बहुतेकजण किमान तिशी उलटून गेलेले असतील, असे गृहीत धरले तर माझ्या बोलण्याचा अर्थ समजेल. आपल्याला स्वत:ला आधी हे वैयक्तिक पातळीवर समजले पाहिजे. बदल हा स्वतः, स्वतःसाठी करायची गोष्ट आहे. मलाही वैद्यकीय क्षेत्राशी संबंध असला तरी माझ्या आरोग्यासाठी मी वैयक्तिक काही पथ्य पाळले पाहिजे. माणूस म्हणून माझ्या स्वत:च्या काय गरजा आहेत, हे ओळखले पाहिजे. स्वास्थ्याचे नियम पाळावेत. ते तात्पुरते दुःखदायक वाटले तरी परिणामी आरोग्य देणे आहे, हे पटले पाहिजे.

थोडक्यात आरोग्य, तंत्रज्ञान, विज्ञान यांचा मेळ साधण्यासाठी काळ, काम, वेगाचे गणित समजायला हवे. याविषयी अधिक जाणून घेऊ पुढील लेखात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -