मुंबई (प्रतिनिधी) : व्यवसायिक व उद्योजक स्वप्नील राजा सावंत यांच्या स्वप्नातील एक दर्जेदार हॉटेल स्वतःच्या मालकीचे सुरू करणे हे त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले होते. राजा सावंत व रश्मी सावंत यांच्या आशीर्वादाने स्वप्नील याने मोठे धाडस करण्याचे मनाशी ठरवले आणि एक अत्याधुनिक, सुसज्ज असे हॉटेल ‘कोकण वैभव’ सुरू झाले.
त्याचे अलीकडेच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी, राजा सावंत, रश्मी सावंत, प्रवीण दहितुले, माजी आमदार श्याम सावंत, डॉ. चंद्रकांत पाटील, रितेश सावंत, सुजय धुरत यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
या ठिकाणी आल्यावर आपल्याला आयुष्यातील वेगळा अनुभव पाहायला मिळेल. भांडुप पश्चिमेच्या अशोक केदारे चौकातील साईनाथ अपार्टमेंट येथील हॉटेल कोकण वैभवमध्ये स्वादिष्ट, रुचकर व खमंग अस्सल मराठमोळ्या मालवणी पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी मेनूचा आनंद घेता येईल, असे ईशान्य मुंबई भाजप युवा मोर्चा सचिव, यशस्वी उद्योजक स्वप्नील राजा सावंत यांनी सांगितले.