Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीबीकेसी दसरा मेळाव्याच्या खर्चाची तपासणी होणार?

बीकेसी दसरा मेळाव्याच्या खर्चाची तपासणी होणार?

उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई : बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी एसटी बसेस, तसेच मेळाव्याच्या प्रमोशन, जाहिराती, समर्थकांच्या खाण्याची सोय आदींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले. नोंदणी नसलेल्या एका पक्षाकडे इतकी रक्कम कशी आली? त्यांच्यावतीने कोणी खर्च केला? त्यांच्या पैशाच्या स्त्रोताबाबत मनी लॉड्रिंग अॅक्ट व आयकर कायद्याच्या तरतुदीअंतर्गत चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते संयज राऊत यांना ५६ लाख रुपये, अनिल देशमुख यांना ४.५ कोटी व नवाब मलिक यांची चौकशी करुन त्यांना अटक करण्यात येऊ शकते तर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी खर्च केलेल्या रकमेची चौकशी करण्यात यावी, असे या जनहित याचिकेत म्हटले आहे.

त्यामुळे याप्रकरणी याच तत्त्वार शिंदे यांची सीबीआय, ईडी, आर्थिक गुन्हे विभाग आणि आयकर विभागाला चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

संजय राऊत, अनिक देशमुख यांची ज्याप्रमाणे चौकशी करण्यात आली, त्याप्रमाणे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जगदेव यांनी याचिकेमध्ये केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -