
मुंबई : मुंबईतल्या कुर्ला येथील नवीन टिळक नगर परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीमध्ये काही जण अडकले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
इमारतीच्या १० ते ११ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही आग भीषण असून या इमारतीतून धुराचे लोट येत आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, किती लोकं अडकले आहेत यासंदर्भात माहिती समोर आली नसून काहीजण खिडकीत बसलेले आहेत.