Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीजखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : दहिहंडी खेळताना थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या तरुणाचे आज मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झाले. प्रथमेशवर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते.

दहीहंडी फोडताना गोविंदाच्या थरावरून कोसळल्याने प्रथमेशला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पाठिचा कणा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे शरीराची हालचाल आणि संवेदना बंद झाली होती. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रथमेश सावंतचे वय २० वर्ष होते. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रथमेश लहान असताना त्याच्या आईचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यानंतर त्याचे वडील आणि बहिणीचे एका आजाराने निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रथमेशचा सांभाळ चुलते करत होते. आयटीआयचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे कामही तो करत होता. प्रथमेशच्या उपचारासाठी मोठा खर्च आला होता. त्यासाठी काहींनी मदत केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने त्याच्या उपचारासाठी ५ लाखांची मदत केली होती.

याआधी थरावरून कोसळलेल्या विलेपार्ले येथील गोविंदा पथकातील संदेश दळवी या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -