Friday, April 25, 2025
Homeदेशगुजरातजवळ पाकिस्तानी बोटीतून ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरातजवळ पाकिस्तानी बोटीतून ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त

सुरत : भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संयुक्त कारवाईत शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ५० किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी ‘अल साकार’ ही पाकिस्तानी बोट पकडली आहे. या अंमली पदार्थांची किंमत सुमारे ३५० कोटी रुपये आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार ‘अल साकार’ या बोटीतून ५० किलो हेरॉईन ड्रग्जची खेप भारताच्या दिशेने आणली जात होती. याबाबत माहिती मिळताच आयसीजी आणि गुजरात एटीएसने आज, शनिवारी सकाळी कारवाई करत ही बोट जप्त केली आहे.

अतिशय खराब हवामानातही आयसीजी आणि एटीएसच्या टीमने ही बोट जप्त करून स्थानिक जखाऊ बंदरावर आणली. यावेळी केलेल्या तपासणीत सदर बोटीत ५० किलो हेरॉईन ड्रग्ज आढळून आले.

गेल्या वर्षभरातील आयसीजी आणि एटीएसची ही सहावी संयुक्त कारवाई आहे. तर, आयसीजीने ड्रग्जने भरलेली बोट पकडण्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे २०० कोटी रुपयांचे ४० किलो हेरॉईन एफएम जप्त करण्यात आले होते. यादरम्यान ६ जणांना अटक करण्यात आली, जे पाकिस्तानी असल्याची माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -