मुंबई : नाशिक येथील बस अपघातात होरपळून जीव गेलेल्या १२ प्रवाशांच्या वारसांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही घटनास्थळी पोहचून आढावा घेतला.
या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार आहेत अशी माहितीही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नाशिककडे रवाना झाले आहेत.