मुंबई (वार्ताहर) : आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी चिअरिंग स्क्वाड इंडिया फाउंडेशनतर्फे (सीएसआयएफ) ‘विजयी भव’ या विजयगीताचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.
हे गाणे पवित्र संस्कृत श्लोकाने सुरू होते आणि ‘विजयी भव’ची तान वाढत जाते आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात. www.myomnamo.com आणि चिअरिंग स्क्वाड इंडिया फाउंडेशन यांची ही संकल्पना आणि निर्मिती आहे. हे गाणे प्रज्ञा पळसुले यांनी शब्दबद्ध आणि स्वरब्ध केले आहे. आणि उदयोन्मुख गायक अभिषेक नलावडे यांनी हे गाणे गायले आहे.
चिअरिंग स्क्वाड इंडिया फाउंडेशनचे (सीएसआयएफ) संस्थापक मकरंद पाटील म्हणाले, ‘विजय भव’ हे गाणे भारतीय क्रिकेट संघाच्या निर्धाराचे प्रतीक आहे, जो प्रत्येक सामन्यात कुरुक्षेत्राची लढाई मानून जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. संपूर्ण देशाने एकत्र येऊन प्रार्थना करावी, ही या मागील संकल्पना आहे. ‘विजयी भव’ हे गाणे म्हणजे एक अब्ज भारतीयांनी भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या पाठिंब्याचे प्रतीक आहे.”