Tuesday, April 29, 2025

सिंधुदुर्ग

‘आंगणेवाडीची रखडलेली विकासकामे मार्गी लागणार’ : रविंद्र चव्हाण

‘आंगणेवाडीची रखडलेली विकासकामे मार्गी लागणार’ : रविंद्र चव्हाण

मालवण (सिंधुदुर्ग) : पालकमंत्री नियुक्ती नंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान, राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रगती व विकास होत असताना सिंधुदुर्गच्यासाठी आपण अधिक प्रयत्नशील आहोत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी परिसरातील रखडलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब आदी उपस्थित होते.

आंगणेवाडी मंदिर परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते, पायवाटा तसेच आंगणेवाडीला जोडणारे सर्व मुख्य रस्ते खड्डेमुक्त व्हावेत. रस्ते मार्ग डांबरीकरण व नूतनीकरण, नळपाणी योजना कार्यान्वीत व्हावी. भाविकांसाठी सुलभ शौचालय उभारणी व्हावी यासह अन्य मागण्या ग्रामस्थांच्या वतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. आंगणेवाडीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्द असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment