Monday, June 30, 2025

'श्रेयस अय्यर' एकदिवसीय अर्धशतक झळकावणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानी

'श्रेयस अय्यर' एकदिवसीय अर्धशतक झळकावणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुरुवारी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह यंदाच्या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.


यावर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पाकिस्तानचा कर्धणार बाबर आझम टॉपवर आहे. त्याच्या नावावर एकूण १७ अर्धशतकांची नोंद आहे. तर, बांग्लादेशचा फलंदाज लिटन दास १३ अर्धशतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, मोहम्मद रिझवान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी आतापर्यंत १० अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत श्रेयस अय्यरचा समावेश झालाय. रिझवानसह श्रेयस अय्यर सयुंक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांनीही यावर्षी प्रत्येकी १०-१० अर्धशतके झळकावली आहेत.

Comments
Add Comment