नवीन पनवेल (वार्ताहर) : सोफा बेड खरेदी करत असल्याचे भासवून ७० वर्षे ईसमाची २७ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठे, सेक्टर २० येथे राहणारे अजय उमापद मित्रा हे सेंट्रल बँक मुंबई येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये घरातील सोफा बेड विक्री करण्याकरता जाहिरात देऊन २५ हजार रुपये किंमत टाकली होती. त्यानंतर त्यांना संजय चौधरी याचा फोन आला व त्याने फोन पे द्वारे पैसे पाठवतो असे सांगितले. यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवले व अजय मित्रा यांच्या बँक खात्यातून पैसे कट झाले. त्यानंतर त्यांना दीपक शर्मा यांचा फोन आला पुन्हा अजय मित्रा यांच्या बँक खात्यातून पैसे कट झाले.
त्यानंतर सुनील अग्रवाल, अरुण कुमार, मोहम्मद इम्रान, मोहित शर्मा, चिरण, राजेश व्यास यांनी अजय मित्रा यांच्याशी संपर्क करून पैसे परत पाठवतो असे सांगितले. व मित्रा यांची गुगल पे व एन ई एफ टी द्वारे २७ लाख ७७ हजार २३५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी संजय चौधरी, दीपक शर्मा, अरुण कुमार, मोहम्मद इमरान, मोहित शर्मा, चिरण, राजेश व्यास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.