Sunday, July 6, 2025

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई (वार्ताहर) : रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे -


कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्य स्थानकावर १० मिनिटे उशिरा पोहोचेल.


हार्बर रेल्वे -


कुठे : कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सुटून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.


पश्चिम रेल्वे -


कुठे : वसई रोड ते वैतरणा अप- डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११. ५० ते रविवारी पहाटे ४.५० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान सर्व लोकल सेवा रद्द असेल. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणाताही मेगाब्लॉक नसेल. ब्लॉकदरम्यान ट्रेन क्रमांक ०९१०१ विरार – भरूच मेमू विरारहून पहाटे ०४.३५ ऐवजी १५ मिनिटे उशिराने म्हणजे ०४.५० वाजता सुटणार आहे.

Comments
Add Comment