Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेबँकेच्या तिजोरीवर डल्ला; १२ कोटींची रोकड पळविणाऱ्या मॅनेजरला अटक

बँकेच्या तिजोरीवर डल्ला; १२ कोटींची रोकड पळविणाऱ्या मॅनेजरला अटक

डोंबिवली (वार्ताहर) : बँकेत कामावर असताना व फावल्या वेळात बँक दरोडा विषयी युट्युबवरून वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारून १२ कोटींची रोकड पळविणाऱ्या बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजरला मानपाडा पोलिसांना अडीच महिन्याच्या तपासानंतर पुण्यातून अटक केली आहे. अल्ताफ शेख (४३) असे अटक केलेल्या कॅश कस्टेडियन मॅनेजरचे नाव आहे. त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या ३ साथीदारांसह त्याच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील एमआयडीसीच्या निवासी विभागात आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. या बँकेत मुख्य आरोपी अल्ताफ हा कॅश कस्टोडियन मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीत असलेल्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा वर्षभरापूर्वी कट रचला होता. याकरिता तो बँक दरोड्याच्या वेब सिरीज पाहत होता. चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केल्यानंतर ९ जुलै रोजी सुट्टीचा दिवस त्याने चोरीसाठी निवडला. प्रथम त्याने अलार्म निष्क्रिय केला. सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून टाकल्या आणि तिजोरीतून ३४ कोटी रुपये त्याने एसीच्या डक्टमधून बनवलेल्या छोट्या छिद्रातून ही रोकड बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या कचरापेटीनजीक ताडपत्रीने झाकून ठेवली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बँकेत ११ वर्षे काम करणाऱ्या अल्ताफचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. तांत्रिक माहिती गोळा केली पण एकही सुगावा सापडला नाही. पोलीस यंत्रणा तपास करत असतानाच मुख्य आरोपीचे दरोडा व चोऱ्या या सारख्या गुन्ह्यांचे चित्रपटांबद्दल असलेले त्याचे वेड समोर आले. बँक दरोडा आणि चोरीच्या अनेक वेब सिरीज व चित्रपट पाहिले असता पैसे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेण्यासाठी एसी डक्ट गॅस कटरने कापून मोठा करून आणि सीसीटीव्ही फुटेजशी छेडछाड करून त्याने संपूर्ण चोरीची योजना कशी आखली हे पोलिसांना समजू लागले. शिवाय चोरी करताना पकडले जाऊ नये म्हणून चेहरा लपण्यासाठी आरोपी अल्ताफ शेख हा बुरखा वापरत होता. लूक कसा बदलायचा हे देखील तो वेब सिरीज पाहून शिकला असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -