Tuesday, July 16, 2024
Homeदेश‘वॉलमार्ट’कडून १५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड?

‘वॉलमार्ट’कडून १५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड?

कर्मचाऱ्यांना दोन महिने अगोदर देणार सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वॉलमार्ट कंपनी सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार आहे. वॉलमार्ट कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार कंपनी सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता असलेल्या वॉलमार्ट कंपनीने बुधवारी ही माहिती दिली आहे. वॉलमार्ट कंपनी जॉर्जिया येथील फुल्टन पार्कवेमध्ये असणाऱ्या ऑफिसमधून सुमारे १५०० कामगारांना कमी करणार आहे. वॉलमार्ट कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये याबाबत माहिती दिली आहे.

वॉलमार्टचे प्रवक्ते स्कॉट पोप यांनी सांगितले की, ‘वाढत्या ऑनलाईन वॉलमार्ट फुलफिलमेंट सर्व्हिसेस व्यवसायाला पाठिंबा देण्यासाठी फुल्टन पार्कवेवरील ऑफीसमध्ये बदल करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इमारतीतील सोयीसुविधा लक्षात घेता त्या पूर्ण करण्यासाठी अधिक जागा लागेल. या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रक्रिया, कर्मचारी आवश्यकता याबाबत कंपनी गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे कंपनी या ऑफीसमधील सुमारे १५०० कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे.’

अमेरिकेतील कामगार कायद्याद्वारे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याआधी पूर्वसूचना देणे आहे. कोणतीही कंपनी १०० किंवा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार असेल. तर त्याआधी ६० दिवस कंपनीने कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना देणे आवश्यक आहे. वॉलमार्ट कंपनीने या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना दिली आहे. कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या मध्यात याबाबत माहिती देण्यात आली होती.

वॉलमार्ट कंपनी आता आधुनिकीकरणावर भर देत आहे. अटलांटा येथील वॉलमार्ट कंपनीच्या इमारतीचे रुपांतर मोठ्या वेअरहाऊसमध्ये करण्यात येणार आहे. ऑनलाइन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे कंपनीने सांगितलं आहे. इमारतीमधील ऑफीसचं रुपांतर गोडाऊनमध्ये केल्यावर ऑफीससाठी कमी जागा ठेवण्यात येईल. परिणामी इमारतीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागेल. त्यामुळे कंपनी सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना हटवणार आहे.

वॉलमार्ट कंपनी जॉर्जिया राज्यात ७०,००० हून अधिक कामगारांना रोजगाराची संधी देते. वॉलमार्ट सध्या वॉलमार्ट फुलफिलमेंट सर्व्हिसेसद्वारे पूर्णपणे ऑनलाईन कामकाजासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनी मनुष्यबळ कमी करत आहे. वॉलमार्टचे प्रवक्ते स्कॉट पोप यांनी सांगितले की, ‘कंपनी कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही कर्मचार्यांना इतर वॉलमार्ट स्टोअर आणि भागींदारांमार्फत नोकरीची संधी देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -