मुंबई : भाषणासाठी कोणाला कोणावरचा ‘राग’ लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो, असे ट्विट करत आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
दसरा मेळाव्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंवर टीका करायला सुरूवात केली आहे. भाषण वाचून दाखविल्याने मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधला.
अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो, असे म्हणतानाच मजा नाय राव बीकेसीत, बीकेसीत सुरू होते केबीसी, खोके असे म्हणत आमदार राजू पाटील यांनी शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
तर नुसतीच “उणी-धुणी” “नळ” आणि “भांडण” विचारही नाही आणि सोनंही नाही, असे वाक्य ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. तर बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी ही टोमणेसभा असणार आहे, असा टोला मनसेचे प्रवक्ते गजनान काळे यांनी ट्विट करत लगावला होता.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…