ज्ञानाचे प्रकार

Share

सदगुरू वामनराव पै

जर कुणी सांगत असेल मला परमेश्वराबद्दल प्रेम आहे, तर त्याला परमेश्वराबद्दल ज्ञान आहे का? नाह़ी मग तो परमेश्वरावर प्रेम कसे करतो? काही लोकांचे म्हणणे हे की देवाला भोळा भाव आवडतो. त्याला ज्ञान वगैरे काही आवडत नाही. आत्मज्ञानी लोकांपेक्षा त्याला भक्तिवान लोक आवडतात असे कीर्तन, प्रवचनातून सांगितले जाते. देवाला भोळा भाव आवडतो असे जे सांगितले ते खरे नाही. “ज्ञान” म्हणजे “Information” आणि तो खूप ज्ञानी आहे म्हणजे त्याच्याकडे खूप “Information” आह़े असे आपण म्हणतो मात्र ज्ञानांमध्येसुद्धा बरेच फरक आहेत. ज्ञानाचे मी चार प्रकार केलेले आहेत.ज्ञानाचे हे चार प्रकार मी “ज्ञानेंचा संदेश” या पुस्तकांत लिहिलेले आहेत.

Knowledge by Instiction, Knowledge by Acquisition, Knowledge by Inspiration, Knowledge by Intution असे ज्ञानाचे चार प्रकार आहेत. पहिला प्रकार Knowledge by instiction म्हणजे जे ज्ञान उपजतच असते. उदाहरण द्यायचे झाले तर भय, निद्रा, आहार व मैथून हे चार प्रकार Knowledge by Instict चे आहेत. सर्व प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये सर्व पक्षी जलचर सर्वांमध्ये हे चार प्रकार भय, निद्रा, आहार व मैथून चालतात. या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत. त्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये जावे लागत नाही.

दुसरा प्रकार म्हणजे Knowledge by Acquistion, जे ज्ञान आपण ऐकण्यातून, वाचण्यातून, पुस्तकातून, व्यवहारातून, अनुभवातून मिळवितो ते ज्ञान म्हणजे Knowledge by Acquistion. तिसरा प्रकार म्हणजे Knowledge by Inspiration, ही एक देणगीच असते. काहींना Inspiration असते, त्याला Knowledge by Inspiration म्हणतात. मोठमोठी काव्ये निर्माण होणे, मोठमोठे शोध लागणे या Inspiration चाच भाग असतो. चौथा प्रकार म्हणजे Knowledge by Initution . Initution ने आलेले हे ज्ञान. हे ज्ञानच अद्भुत असते. उदाहरण द्यायचे झाले तर ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे जिवंत उदाहरण. त्यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर सांगितली.ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर सांगितली. ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीत केवढा अर्थ भरलेला आहे. भल्याभल्यांना ते समजत नाही. आता हे कुठून आले? हा Initution चाच भाग आहे. काही लोक मोठमोठे आकडे भरभर सांगतात. कॉम्प्युटरने सांगावे तसे भरभर सांगतात. हा सुद्धा Initution चा प्रकार आहे. साक्षात्कार होतो तो सुद्धा Initution चा भाग आहे. देवाचा साक्षात्कार होतो तो initution ला होतो. Initution ही देवाच्या कृपेने मिळते. सदगुरूकृपेने मिळते व अभ्यासाने सुद्धा ती मिळू शकते. एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला तर ती मिळू शकते.

Recent Posts

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

9 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

34 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

37 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

1 hour ago

“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…

1 hour ago

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

3 hours ago