Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची. ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची...

ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची. ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची : एकनाथ शिंदे

मुंबई : बीकेसी मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची, ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आणि तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

बाळासाहेबांचे खरे वारसदार शिवसैनिक आहेत. वारसा विचारांचा असतो, तो जपायचा असतो. आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा जपला आहे. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही तर बापाचे विचार विकले. एक मर्यादा असते सहन करण्याची. सत्यासाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. खरे गद्दार कोण, हे जनतेला समजले आहे. त्यामुळेच जनता आमच्यासोबत आहे. अशी टिका शिंदे यांनी केली आहे.

आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्कारुन शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणार नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचे आहे. समोर बसलेला प्रत्येक जण बाळासाहेबांचे निष्टावंत सैनिक आहोत. त्यांचे विचार तुमच्या-आमच्या धमन्यामध्ये आहेत. ते कधीच कोणालाही काढता येणार नाहीत.

मी कुणावर टीका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही कायम आहोत. आमचे विचार बदलणार नाहीत, बदलले नाहीत. तुम्ही मात्र भरकटलात. सत्तेसाठी लाचार झालात. बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा पुरस्कार केला. पण हिंदुत्ववादी राजकारण करत चूक केली, असे राज्याच्या सर्वेच्च सभागृत तुम्ही सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी…? बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती? २५ वर्ष युतीत आम्ही सडलो. हे जाहीरपणे सांगताना तुम्हाला काहीच वाटले नाही का?, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दार नव्हे तर तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला, विचारांशी पाप केले आहे. त्यासाठी पहिला बाळासाहेबांच्या समाधीवर डोके ठेवा, मग आमच्यावर टीका करा. शिवसेना उभारण्यासाठी आम्ही ४० वर्षे काम केले, आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. आता आम्हाला गद्दार म्हणता? बाळासाहेबांकडे बघून आम्ही गप्प बसलो. अडीच वर्षांपूर्वीच अनेक आमदारांनी सांगितले होते की ही आघाडी योग्य नाही. पण आम्ही सहन केले. पण बाळासाहेबांचे विचार खु्ंटीला टांगल्यानंतर आम्ही गप्प बसणे शक्य नव्हते. आम्ही जे केले ते राज्याच्या भल्यासाठी केले असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -