नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धडाकेबाज फलंदाज भारताचा मिस्टर ३६० अर्थात सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत १९५.०८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने ११९ धावा तडकावल्या आहेत. या धडाकेबाज खेळीसह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंत १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम सूर्यकुमारने आपल्या नावे केला आहे. सूर्यकुमारने ५४३ चेंडूंत एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच लयीत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही उत्तम फलंदाजी करत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ३३ चेंडूंत ५० धावा, दुसऱ्या सामन्यात २२ चेंडूंत ६१ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ६ चेंडूंत ८ धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने १९५.०८ च्या स्ट्राईक रेटने या धावा ठोकल्या आहेत.
सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध टी-२० मालिकेत धडाकेबाज कामगिरी केली आहे. या दोन्ही टी-२० मालिका भारतीय संघाने खिशात घातल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत १९५.०८ पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने ११९ धावा तडकावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव सध्या सुसाट आहे. मधल्या फळीत तो खोऱ्याने धावा जमवत आहे. सूर्यकुमार यादवमुळे भारताची मधली फळी अधिक मजबूत झाली आहे.