Monday, January 20, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपोषण ट्रॅकर: कुपोषणविरोधातील परिवर्तक

पोषण ट्रॅकर: कुपोषणविरोधातील परिवर्तक

इंदेवर पांडे

देशातील असुरक्षित घटक, विशेषतः बालके आणि महिला यांच्यात कुपोषण हे सातत्याने सामोरे लागणारे आव्हान आहे. जगाच्या तुलनेत भारतात कुपोषितांचे प्रमाण खूपच जास्त आहे. १९९२-१९९३ मध्ये झालेल्या एनएफएचएस अर्थात पहिल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात बाल आरोग्य निर्देशांकात सुमार कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होता. आयसीडीएस अर्थात एकात्मिक बाल विकास योजनासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महिला आणि बालविकास मंत्रालय नियोजनबद्ध कार्यक्रमांद्वारे कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. असुरक्षित घटक म्हणजे सहा वर्षाखालची बालक, गरोदर महिला, स्तन्यदा माता आणि पौगंडावस्थेतील मुली यांना पूरक पोषण आहार कार्यक्रम, पूरक अन्न, पोषक शिधा पुरविणे या पूरक पोषण कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

नियोजनबद्ध पद्धतीने कुपोषणाची समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान समग्र पोषण अर्थात पोषण अभियानाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. कमी पोषण, खुरटलेली वाढ, अशक्तपणा, जन्मजात बालकांत कमी वजन या समस्यांवर मात करण्यासाठी सहयोग मंत्रालय/विभागांबरोबर अभिसरण पद्धतीने समुदायाधारित वर्तणुकीतील बदलावर लक्ष केंद्रित करत तसंच जन आंदोलनाच्या माध्यमातून आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतर बाबींसोबतच प्रभावी पद्धतीने नियंत्रण करत असून ही या अभियानाची ठळक वैशिष्ट्य ठरली आहेत. सन्माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सरकारने सेवा वितरणाच्या परिणामात सुधारणा करण्यात तंत्रज्ञान हा महत्त्वाचा घटक असल्यावर भर दिला आहे. यासाठीच कुपोषण संबंधित आकडेवारी आणि नोंदणीचे अंकेक्षीकरण करण्याच्या उद्देशाने पोषण ट्रॅकर ॲपची सुरुवात करून देशभरातल्या अंगणवाडी केंद्रात आयसीडीएसच्या माध्यमातून सेवा वितरण करत प्रत्यक्ष वेळेच्या जवळ जाण्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी धोरण आखून २०२१ मध्ये पोषण ट्रॅकर ॲप सुरू करण्यात आला.

पोषण अभियानांतर्गत पहिल्यांदाच अंगणवाडी केंद्र आणि तिथल्या कार्यकर्त्यांना स्मार्टफोन देण्यात आले. पोषण ट्रॅकरअंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करत दररोज १३.९ लाख कार्यरत अंगणवाडी केंद्रातून ९.८ कोटी लाभार्थ्यांची समग्र माहिती संकलित करत अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी कार्यकर्ते तसेच अंगणवाडी कर्मचारी सेवांना योग्य वितरण व्यवस्थापन आखत बालक, गरोदर महिला आणि स्तन्यदा माता यांच्यातल्या लाभार्थ्यांचा योग्य आढावा घेणे शक्य झाले. तसेच यामुळे पर्यवेक्षक आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांना याची प्रगती व या प्रगतीची नोंद करण्यासाठी तसेच सेवा वितरण पुरवठा साखळीत यांच्यातील फरक कमी करण्यासाठी वेब तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या प्रगतीचा समग्र आढाव्याचा मागोवा घेता येतो. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त अन्य प्रादेशिक भाषांमध्ये देखील हे उपलब्ध आहे.

देशातील शेवटच्या टप्प्यातील घटकापर्यंत वितरण सेवा मिळण्याची खात्री करण्यासाठी यामागे मंत्रालयाचे सातत्यपूर्ण प्रयत्न होते. याशिवाय हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पोषण ट्रॅकरवर नोंद असलेल्या आधारची जोडणी करण्यात आली. ज्या ठिकाणी बालकांचा आधार क्रमांक उपलब्ध नसेल त्या ठिकाणी ही सेवा मातेच्या आधार क्रमांकाबरोबर जोडण्याची सेवा पुरवण्यात आली. लाभार्थ्यांच्या आधार जोडणीमुळे नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तसंच सेवा वितरण मागोवा घेण्याचे काम शेवटच्या घटकापर्यंत होऊन यात कोणतीही गळती किंवा बनावट प्रवेश नाकारले जातात. आजच्या तारखेनुसार सुमारे ८२ टक्के लाभार्थी आधारशी जोडले गेले आहेत. याशिवाय पोषण ट्रॅकरचा वापर अंगणवाडी सेवांच्या स्थलांतर रचनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जागतिकीकरण करण्यासाठी केला आहे ट्रॅकरमधल्या स्थलांतर कामकाज रचनेमुळे एका अंगणवाडी केंद्रातून देशभरातील दुसऱ्या कुठल्याही अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांची नोंदणी तसेच दस्तावेजांची अदलाबदल सहजरीत्या शक्य आहे. राज्यांतर्गत अथवा देशाच्या कोणत्याही भागातून या सेवांचा वापर करणे लाभार्थ्यांना सुलभ झाले आहे.

या सेवांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी डेटा, माहिती, पुरावे आणि प्रतिसाद या गोष्टी निर्णय घेण्यासाठी आणि पर्यायी कार्यक्रम राबवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पोषण ट्रॅकर हा फक्त माहितीचा मागोवा घेण्याची यंत्रणा नसून हे सेवावितरणाची क्षमता आणि परिणामकारकता याच्या प्रत्यक्षकालीन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरत आहे. पोषण ट्रॅकरला सुरुवात होऊन केवळ दीड वर्षांचा कालावधी झाला आहे. एकदा ही प्रणाली स्थिरस्थावर झाली की सुमारे तेरा लाख अंगणवाडी केंद्रामधून दैनंदिन तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर समग्र माहिती गोळा करणे सहजसाध्य आहे तसंच पोषण परिणाम मूल्यांकनाची ट्रॅकरची क्षमता अमर्यादित आहे. बहुधा जगातल्या इतर कोणत्याही देशात अशा प्रकारचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणावर आखला जात नाही. आतापर्यंत कुपोषणाची समग्र माहिती एनएफएचएस अहवालाच्या माध्यमातूनच उपलब्ध होती, जी कालबद्ध आणि घरगुती नमुन्यांवर आधारित होती. मात्र अंगणवाडी सेवांतर्गत नोंद असलेल्या प्रत्येक एकल लाभार्थ्याचा आरोग्य आणि पोषण निर्देशांक गोळा करून त्यावर नियंत्रण करण्यातला प्रभावी सहभाग अभूतपूर्व आहे.

तंत्रज्ञान लोकांच्या जीवनमानात परिवर्तन घडवते, गरिबी कमी करून प्रक्रिया सुलभ करते तसेच भ्रष्टाचार संपवून चांगल्या सेवा प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान सर्वव्यापी ठरत असल्याचे पंतप्रधान यांनी म्हटले आहे. मानवी प्रगतीचा केवळ हाच महत्त्वाचा घटक ठरला आहे. देशातली बालके आणि तरुण निरोगी आणि पोषक तत्त्वांनी युक्त असतील तेव्हाच देशाला शास्त्रीय लोकसंख्येच्या दृष्टीने लाभ आणि मानवी भांडवलाचा फायदा होऊ शकतो. आपल्याला जाणीव होते की, कुपोषण ही केवळ पीडित मुलांसाठीच नव्हे तर देशातील सामाजिक-आर्थिक स्थैर्य कमकुवत करत ही समस्या कौटुंबिक आणि सामाजिक ताणही वाढवते. जेव्हा सशक्त आणि निरोगी लोकसंख्या निर्माण होणे आवश्यक असते तेव्हा योग्य पोषण आणि तंत्रज्ञानातल्या योग्य प्रगतीमुळे कुपोषणावर मात करून त्याचे दुष्परिणाम लक्षणीयरीत्या रोखायला मदत होते. सर्वंकष पोषण आणि आरोग्य जागरूकतेचा प्रसार करून आपण भारतातल्या बालकांचे आणि महिलांचे निरोगी भवितव्य सुनिश्चित करत आहोत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -