मुंबई : बीकेसीवर सुरु असलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतूक केले आहे.
दरम्यान, ते म्हणाले हा कष्टकऱ्यांचा, कामगारांचा नेता आहे. त्यामुळे आता सर्व बरखास्त करून पुन्हा निवडणुका होवूद्या हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले. सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या… राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले. ते आज मुंबईत एकनाथ शिंदे यांनी आयोजीत केलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होते.