Saturday, July 5, 2025

उत्तराखंडमध्ये लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू

पौडी गडवाल : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनानंतर पौडी गडवाल जिल्ह्यातील लॅन्सडाऊन जवळील सीमडी गावाजवळ लग्नाच्या वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस ३५० मीटर खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. यात जवळपास २५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वार जिल्ह्यातील लालढांग येथून सुमारे ४० ते ४५ वऱ्हाड्यांना घेऊन ही बस कांडा तल्ला गावाच्या दिशेने निघाली होती. बसमधील एका प्रवाशाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी १२ वाजता लालढांग येथून निघालेली ही बस संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सीमडी गावाजवळ पोहचली. यावेळी बसचा स्प्रिंग पट्टा तुटला आणि बस अनियंत्रित होऊन ३५० मीटर खोल दरीत कोसळली. ही बस एका दगडावर अडकून पडली आहे. या बसमधील काही प्रवासी बाहेर आले त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती दिली. तसेच स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने देखील घटनास्थळी धाव घेतली. बीरोखाल आरोग्य केंद्रातून ५ डॉक्टरांची टीम देखील घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.


दरम्यान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धाम यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा