
मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सीसीटीव्ही दृष्यांमधून मिळते. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला सुद्धा मागून येणाऱ्या तीन गाड्या धडकल्या. गाड्या पाठोपाठ आदळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर वरळी सी लिंकवर एकच गोंधळ उडाला. याबाबत अधिक तपासणी पोलिसांकडून सुरू असून वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला होता.