Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची हत्या

जम्मू : जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची सोमवारी रात्री उशिरा गळा चिरुन हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे पोलिसांनी त्यांच्या मदतनीसावर संशय व्यक्त केला आहे. सध्या हा मदतनीस फरार आहे. पोलिसांकडून या मदतनीसाचा शोध सुरु आहे. हेमंत लोहिया यांच्या हत्येची माहिती मिळताच जम्मू काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर आले. गुप्तचर यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत.

हेमंत लोहिया यांचा मृतदेह शहराबाहेरील निवासस्थानी आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले असल्याचे आढळून आले आहे.

पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, लोहिया यांच्या पायाला तेल लावले असल्याचे आढळून आले. त्यांचा पाय काहीसा सुजला होता. मारेक-याने लोहिया यांना गुदमरुन ठार केले. त्यानंतर केचअपच्या बॉटलच्या काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा तपास सुरु असून, घटनास्थळाची वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -