पुणे : पुण्यातील चांदणी चौक पाडल्यानंतर या परिसरात आज पुन्हा दोन ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती पुणे वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी दिली. पुलाच्या बाजूचा खडक फोडण्याचे काम बाकी होते. खडक फोडण्याचे काम ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक आज दिवसभरात २ वेळा २० मिनिटे बंद करण्यात आली होती.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुरु व्हावेत यासाठी हे खडक फोडण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला असून आता रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला असून आता रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडक असल्यामुळे ब्लास्ट करून या खडकाला फोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.