मुंबई : स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लुप्त झालेल्या होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीमधील जीनोम संबंधित अभ्यासाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
स्वीडनचे स्वांते पाबो हे एक जेनेटिस्ट असून ते मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधन करतात. ते पॅलिओजेनेटिक्सच्या संस्थापक शास्त्रज्ञांपैकी एक असून त्यांनी निअॅन्डरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे. त्यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे की, आपल्या संशोधनातून स्वांते पाबो यांनी असे काही केले आहे की जे या आधी अशक्य समजले जायचे. निअॅन्डरथल जीनोमचा क्रम ठरवणे हे त्यांचे मोठे संशोधन आहे.
निअॅन्डरथल जीनोम सध्या लुप्त झाले आहे. स्वांते पाबो यांनी होमिनिन डेनिसोवा यासंबंधितही संशोधन केलं आहे. होमिनिन्स जीन्स सध्या झालेले आहेत. पण त्यांचे हस्तांतर होमो सेपियन्समध्ये झाल्याचा शोध स्वांते पाबो यांनी लावला आहे. जुन्या जीन्सचे आताच्या पीढीपर्यंत हस्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीचे विजेते डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पॅटपुटियन यांचा समावेश होता. त्यांचा शोध मानवी शरीराचे तापमान आणि स्पर्श कसे ओळखतात यावर आधारित होते.