भोपाळ : मध्य प्रदेशमधील बाबा पुरूषोत्तमानंद यांनी जवळपास ७ फूट खोल खड्ड्यात भू-समाधी घेतली होती. त्यानंतर ते आता तब्बल ७२ तासानंतर सुखरूप बाहेर आले असून त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
बाबा पुरूषोत्तमानंद यांनी ३० सप्टेंबर रोजी जिवंत समाधी घेतली होती. त्यांना समाधी घेण्यासाठी तब्बल सात फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. त्यानंतर तब्बल ७२ तासांच्या कठोर तपश्चर्येनंतर ते आज या समाधीतून बाहेर आले.
दरम्यान, या बाबांना समाधी घेण्यापूर्वी पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतल्यानंतर समाधी घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.