Thursday, June 19, 2025

वरळीत आदित्य ठाकरेंना धक्का: शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

वरळीत आदित्य ठाकरेंना धक्का: शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : वरळीमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.वरळीतील शेकडो शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’वर जात शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. कोळीवाड्यातील ५०० कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी 'वर्षा' बंगल्यावर जात शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी भेट घेतली आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. ऐतिहासिक दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परपंरेनुसार शिवाजी पार्कवर होणार आहे. तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा