सुमती पवार
ढगोबा ढगोबा नको तू येऊ
बरसतो तू का इतका भाऊ…
चिखल झालाय रे शेतात फार
सडलीत पिके नि फिरलंय वारं……
बळीची चिंता कर ना जरा
अवकाळी मध्येच पाडतोय गारा…
बापाने माझ्या घेतलाय फास
तोंडातून काढलास आमच्या तू घास…
शिक्षाण माझं थांबलं आता
रोजगार येईल आता रं हाता…
पेटवावी चूल ती सांग ना कशी
चांगलंच पाडलंय बाबा तू फशी……
आई रं माझी रडतेय रोज
जगण्याचं झालंय तिला बी ओझं…
ढगोबा सांग ना काय मी करू?
लहानगी भैन रं हाय ना सरू… …
पर्यावरण म्हनत्यात काही
समतोल म्हनत्यात ऱ्हायला नाही…
म्हनून म्हनत्यात तू वागतोय असं
जगावं सांग ना आमी रं कसं…?
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…