सुमती पवार
ढगोबा ढगोबा नको तू येऊ
बरसतो तू का इतका भाऊ...
चिखल झालाय रे शेतात फार
सडलीत पिके नि फिरलंय वारं…...
बळीची चिंता कर ना जरा
अवकाळी मध्येच पाडतोय गारा...
बापाने माझ्या घेतलाय फास
तोंडातून काढलास आमच्या तू घास...
शिक्षाण माझं थांबलं आता
रोजगार येईल आता रं हाता...
पेटवावी चूल ती सांग ना कशी
चांगलंच पाडलंय बाबा तू फशी…...
आई रं माझी रडतेय रोज
जगण्याचं झालंय तिला बी ओझं...
ढगोबा सांग ना काय मी करू?
लहानगी भैन रं हाय ना सरू... …
पर्यावरण म्हनत्यात काही
समतोल म्हनत्यात ऱ्हायला नाही...
म्हनून म्हनत्यात तू वागतोय असं
जगावं सांग ना आमी रं कसं...?