नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे येथील बोनकोडे गावात चार मजली इमारत कोसळली आहे. कोसळलेली इमारत फार जुनी होती. इमारत हलत असल्याने अगोदरच नागरिकांना बाहेर काढले होते. मात्र, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
इमारतीमधील ४० कुटुंबांना बाहेर सुखरूप काढल्याने अनर्थ टळला. इमारत कोसळण्याअगोदर इमारत हलत असल्याचे निदर्शनास आल्याने इमारतीत राहत असलेल्या नागरिकांना इमारती बाहेर काढण्यात आले. या इमारतीची एक बाजू पूर्णतः कोसळली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कोणी नागरिक अडकले आहेत का? याची पाहणी केली.