Tuesday, December 3, 2024
Homeकोकणरायगडमूर्ती चालल्या परत मूर्तिकारांकडे; पनवेलमध्ये अनोखा उपक्रम

मूर्ती चालल्या परत मूर्तिकारांकडे; पनवेलमध्ये अनोखा उपक्रम

नवीन पनवेल (वार्ताहर) : गणेशमूर्ती पूजनानंतर घरच्या घरी विसर्जन करून उरलेली माती मूर्तिकारांना परत देऊन शून्य प्रदूषणाचा अभूतपूर्व उपक्रम खारघर, कामोठे, सुकापूर, पनवेल, नवीन पनवेल व करंजाडे येथील पनवेल वैस्ट वॉरियर्सकडून मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमात घनश्याम पाटील, गौरी काशीकर, प्रल्हाद बोडके, तनय दीक्षित, विनोद शिंगण व वृषाली म्हात्रे यांनी कृतीतून जनजागृतीची मुहूर्तमेढ रोवली. मूर्तिकारांचा आर्थिक फायदा, पर्यावरण संरक्षण व मूर्तीच्या मातीतून परत देवाच्या मूर्ती घडून पवित्र व अध्यात्मिक लाभ, अशी त्रिसूत्री असलेला कार्यक्रम गणेश शिंदे, प्रतिक्षा महाडिक, राजीव अधिकारी व तुषार लेले यांनी भक्तिभावाने साजरा केला.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात लवकर न विरघळल्याने, मूर्तीचे अवयव भंगतात. मोठाले तुकडे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणून प्रवाह तुंबतात. त्याचबरोबर जलस्त्रोतांची गढूळता, ऍसिडिटी, उष्णता व क्षारता वाढते. पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. प्रकाश कमी मिळाल्याने प्रकाश संश्लेषणात अडथळे येतात. मूर्तीच्या सिंथेटिक रंगातील जड व विषारी धातू पाणवनस्पती व माश्यांमधून अन्नसाखळीत प्रवेश करतात.

विसर्जनानंतर कृत्रिम तलावातून काढलेले डेब्रीस हे देखील प्रचंड मृदा प्रदूषण करते. दरवर्षी मूर्ती विसर्जनाचा आकडा २० करोडच्या घरात जातो. पनवेल वैस्ट वॉरियर्सनी या परिस्थितीचा अभ्यास केला. काळाची गरज ओळखून मूर्ती घरच्याघरी विसर्जनानंतर राहिलेली माती मूर्तिकारांना भेट देऊन अनेक दुष्परिणाम थांबवण्याचा पायंडा पाडला. दगड, धातू वा मातीची मूर्ती हे पर्याय देखील डोळस नागरिकापुढे आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी व वाहतूक कोंडी न करता, शून्य डेब्रीज, शून्य प्रदूषण व शून्य खर्चाचा हा उपक्रम लवकरच सर्वत्र करण्याचा मानस पनवेल वैस्ट वॉरियर्सचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -