मुंबई (प्रतिनिधी) : पर्यटन क्षेत्रात काम करणारे भागधारक यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय पर्यटन विभाग व राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे पर्यटन क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा करताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर, राज्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, पर्यटन वाढीसाठी पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करेल तसेच आज राज्यात या क्षेत्रात येणा-या उद्योजकांना प्रोत्साहन देणारी धोरणे शासन अवंलबत आहे तरी चर्चेत सर्वांच्या अडचणी जाणून घेवून नक्कीच यावरती ठोस उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.