Sunday, October 26, 2025
Happy Diwali

ती सुंदर व्यक्ती कोण? मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह?

ती सुंदर व्यक्ती कोण? मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह?

निलेश राणे यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवाराविषयी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले असून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

निलेश राणे यांनी एक भयंकर खळबळजनक ट्वीट केले आहे. आपल्या या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात, "ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का? स्वर्गीय मीना साहेब (माँसाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या, कुठल्या परिस्थितीत गेल्या, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झालं हे देखील महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1575712053750165504

निलेश राणेंच्या या ट्वीटमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निलेश राणेंनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी आणि उद्धव ठाकरेंच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच आता या ट्वीटमधली सुंदर व्यक्ती कोण? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >