काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील एका शाळेत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत १०० मुलांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील पत्रकार बिलाल सावरी यांनी एका शिक्षकाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. घटना इतकी भीषण आहे की, मुलांचे हात-पाय गोळा करून त्यांची ओळख पटवली जात आहे.
हा हल्ला किती भीषण होता, याचा अंदाज बिलाल सावरी यांनी केलेल्या ट्विटवरून लावता येईल. या हल्ल्यात शाळेचे मोठे नुकसान झाले असून, शाळेत मृतदेहांचा ढीग लागला आहे. विशेष म्हणजे, तालिबानने येथील माध्यमांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले आहे. तालिबानने रुग्णालयांनाही हल्ल्याशी संबंधित माहिती मीडियाला देऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्याची माहितीही बिलाल यांनी दिली.
काबूल पोलिस प्रमुखांचे तालिबान-नियुक्त प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी दश्ती बर्ची भागातील एका शाळेत हा स्फोट झाला. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया समुदायाचे बहुतांश लोक या भागात राहतात. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. काज हायर एज्युकेशनल सेंटर, असे या शाळेचे नाव आहे. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…