अहमदाबाद (वार्ताहर) : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघाने पुरुष गटात अटीतटीच्या लढतीत यजमान गुजरात संघावर दोन गुण व सहा मिनिटे राखून विजय मिळवत आगेकूच केली.
महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाला गुजरात संघाने चांगलेच झुंजविले. चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने गुजरातचा २८-२६ असा पराभव केला. या लढतीत महाराष्ट्र संघाकडून अक्षय भांगरे, ह्रषिकेश मुर्चावडे, लक्ष्मण गवस, अविनाश देसाई, सुयश गारगाटे, प्रतिक वाईकर, रामजी कश्यप या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि संघाचा पहिला विजय साकारला. आता शनिवारी सकाळी महाराष्ट्र संघाचा सामना दिल्ली संघाशी होणार आहे.