Tuesday, October 8, 2024
Homeक्रीडामहाराष्ट्राच्या टेनिसपटू अर्जुन कढेला ६.७० लाख रुपयांची बोली

महाराष्ट्राच्या टेनिसपटू अर्जुन कढेला ६.७० लाख रुपयांची बोली

टेनिस प्रीमियर लीग

मुंबई (वार्ताहर) : टेनिस प्रीमियर लीगच्या (टीपीएल) चौथ्या हंगामासाठीच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये महाराष्ट्राच्या अर्जुन कढे याला ६ लाख ७० हजार रुपयांची, तर अंकिता रैना हिला ५.५० लाख रुपयांची, ऋतुजा भोसलेला ३.६५ लाख रुपयांची बोली लागली. पुणेकर अर्जुन आणि अहमदनगरच्या ऋतुजा यांना पुणे जग्वार्स संघाने करारबद्ध केले. पुण्याच्या अंकिता हिच्यावर गुजरात पँथर्सने विश्वास दाखवला.

पुरुष गटात १२ आणि महिला गटात ४ खेळाडूंचा समावेश आहे. यात महाराष्ट्राचे चार टेनिसपटू आहेत. पुरुष खेळाडूंमध्ये रामकुमार रामनाथन आणि अर्जुन कढे यांची (प्रत्येकी ६.७० लाख रुपये) बोली समान आहे.

अर्जुननंतर सिद्धांत भाटिया याच्यावरही (१.५० लाख रुपये) बोली लागली. त्याला दिल्ली बिनीज् ब्रिगेड संघाने करारबद्ध केले. पुरुष टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक बोली २०२२ विम्बल्डन स्पर्धेतील दुहेरीतील विजेता ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू इब्डेन याला लागली. दिल्ली बिनीज् ब्रिगेड संघाने त्याला ८.४५ लाख रुपयांना करारबद्ध केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -