Wednesday, April 30, 2025

अध्यात्म

हसरा दसरा, सुखी रहा वासरा

हसरा दसरा, सुखी रहा वासरा विलास खानोलकर हसरा दसरा, सुखी राहा वासरा साईनाथाचा भक्तांना संदेश शिर्डी साईचा पवित्र आदेश ।।१।। मन लावून ऐकतो सारा देश प्रसन्न होई सारा प्रदेश ।।२।। हिरवागार करा सारा प्रदेश लेंडीबाग सारखा सुंदर देश ।।३।। लावा चिकू, जांभूळ आंबा पावलाला पाण्याचा थांबा ।।४।। पक्षासाठी फळझाडे फुलपाखराची फुलझाडे ।।५।। मधमाश्यासाठी कमल वेली चिमणीपाखरे मधुमालतीवेली ।।६।। गुलाब सुगंधाचा राजा शिर्डीत बसला साईराजा ।।७।। मोगरा, बकुळ रातराणी शिर्डी तीर्थक्षेत्राची राणी ।।८।। शिर्डी सारी द्वारकामाई साईसारखी प्रेमळ आई ।।९।। गोर-गरीब बंधू ताई साईत पाही बालक आई ।।१०।। साईप्रार्थना ऐके दिनरात संकटात देई साईच साथ ।।११।। दुश्मनाला साई मारे लाथ लावता निरांजनात वात ।।१२।। साईनामाने संकटावर मात श्रद्धेने थरथरे दिव्यातील वात ।।१३।। साईश्रद्धेने पाण्याची पणती दिवाळीत चमके पणती ।।१४।। लाजती आकाशातल्या तारका पाहुनी साई शिर्डी स्मारका ।।१५।। उत्सव उत्सहात नवरात्र शिर्डी वाहे दिनरात ।।१६।। लाखो करोडोंची पंढरी शिर्डी साई पांढरी ।।१७।। हजारो पालख्या दिनरात भक्त पोहोचती रातोरात ।।१८।। रस्तोरस्ती साई भंडारा कोणालाही पत्ता विचारा ।।१९।। गावोगावी हजारो पत्रावळी खिचडी, फळे कोवळी ।।२०।। भक्त चेपती भक्तांचे पाय समजूनि ते साईनाथांचे पाय ।।२१।। न थकता चालती भक्त म्हाताऱ्याला बनवी सशक्त ।।२२।। वैद्यराजाचे नवेच तंबू औषध पाणी दुधाचे चंबू ।।२३।। रस्तोरस्ती पायघड्या लाल साईनाम जेथेजेथे जाल ।।२४।। भक्त उधळत जय गुलाल भगवाझेंडा भाळी गुलाल ।।२५।। जशी ज्ञानेशाची वारी तशीच साईनाथांची वारी ।।२६।। जशी चाले तुकोबाची पालखी गावोगावी साईंची पालखी ।।२७।। गुढया पताका रंग भगवा गावोगावी साईंचा सांगोवा ।।२८।। इंद्रलोकासारखी चकाके शिर्डी हृदयात चमके साईंची शिर्डी ।।२९।। श्रद्धासबुरी शिर्डी वारी एकदा तरी करा वारी ।।३०।। ३३ कोटी देव गाईच्या हृदयात साई १३३ कोटी हृदयात ।।३१।। साई बैसला पशुपक्षात साई गरिबांच्या सिंहासनात ।।३२।। साईनाथ महाराज कि जय !!
Comments
Add Comment