Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरबोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू

बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू

प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज

बोईसर (वार्ताहर) : प्रेम प्रकरणातून तरुणीवर भर रस्त्यात पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी टीमा हॉस्पिटल समोर घडली. यामध्ये सदर तरुणाचा देखील अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

बोईसरमधील टीमा रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कृष्णा यादव (रा. कोलवडे) या माथेफिरू तरुणाने स्नेहा मेहतो (रा. सरावली वय २१) या तरुणीची पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली. गोळी मारून पळून जात असताना, डी डेकोर कंपनीजवळ सीआयएसएफ च्या गाडीखाली आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला टीमा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादारम्यान त्याचा देखील मृत्यू झाला आहे.

बोईसर पोलिसांना या घटनेची खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने बोईसर परिसरात खळबळ माजली आहे. माथेफिरू तरुणाने प्रेम प्रकरणातून गोळी झाडून तरुणीची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा, पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे उपस्थित असून या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -