अयोध्या : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त आज अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्याशिवाय या चौकात एक ४० फूट आणि १४ टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली. मोदींनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला.
अयोध्येतील चौकाला लता मंगेशकर यांचे नाव
४० फुटी वीणेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन!
