मुंबई : एमपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसेच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल. ३० एप्रिल रोजी परीक्षा पार पडेल.
‘एमपीएससी’च्या २०२३ या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन पाहता येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.https://t.co/lhmVQhZwry
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2022