नवी मुंबई (वार्ताहर) :महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत घर क्र. ५८७/२, बोनकोडे गाव, सेक्टर-१२ ई, कोपरखैरणे घर क्र. ५९५, बोनकोडे गाव, सेक्टर-१२, कोपरखैरणे, नवी मुंबई यांना त्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती.
सदर बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरीत्या बांधकाम चालू होते. या अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, तसेच न.मुं.म.पा. पोलीस पथक, ९ मजूर, १ गॅस कटर, ५ ब्रेकर, १ पिकअपचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम खर्च वसूली रु. २५,०००/- जमा करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.