नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अर्ज भरणार आहेत. यामुळे अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आजपासून अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीत गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ति नसणार आहे यावर शिक्का मोर्तब झाले आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या चर्चा सुरु असताना काल राजस्थानमध्ये गेहलोतांनी आमदारांची बैठक घेतली. यावेळी काळजी करु नका, मी तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही, असे त्यांनी आपल्या समर्थकांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याची वेळ आली तरी राजस्थानवरची आपली पकड गेहलोत सैल होऊ देणार नाहीत हे उघड झाले आहे.