नवी दिल्ली : कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेले टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजू श्रीवास्तवचे आज वयाच्या ५८व्या वर्षी निधन झाले.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्याने प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्याने टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.
१० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.
Comedian Raju Srivastava passes away in Delhi at the age of 58, confirms his family.
He was admitted to AIIMS Delhi on August 10 after experiencing chest pain & collapsing while working out at the gym.
(File Pic) pic.twitter.com/kJqPvOskb5
— ANI (@ANI) September 21, 2022
राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजकीय, बॉलिवूड अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे.
१९८९ मध्ये रिलीज झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्यांनी काम केले होते. २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. तसेच ‘बिग बॉस ३’, ‘नच बलिए’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केले. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ अशीही राजू श्रीवास्तव यांची ओळख होती. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.