Friday, March 28, 2025
Homeमहत्वाची बातमीरंग महागल्याने देवीच्या मूर्त्या ४० टक्क्यांनी महागल्या

रंग महागल्याने देवीच्या मूर्त्या ४० टक्क्यांनी महागल्या

नाशिक (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरिता देवीच्या मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग महागल्यामुळे यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात व सभोवतालच्या परिसरामध्ये सतत पाऊस पडत आहे. याच कारणामुळे मूर्तीकारांना मूर्त्याना रंग देताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येवला शहरातील कारागीर देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे दिसून येत असले तरी येथील सततच्या पावसामुळे वातावरणात ओलावा आहे. याच कारणामुळे घडवलेल्या मूर्त्या अद्याप ओल्याच आहेत.

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मूर्तीकारांना मूर्त्यावर रंग चढवण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे मूर्तीसाठी वावरण्यात येणारे रंगही या वर्षी महागले आहेत. त्यामुळे देवीच्या मूर्तींच्या किमतीमध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तशी माहिती येवला येथील मूर्तीकारांनी दिली आहे.

दरम्यान, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी होते. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत. यंदा कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव अगदी धामधुमीत पार पडला. त्यामुळे नवरात्रोत्सवही तेवढ्याच धामधुमीत पार पडणार आहे. देवीच्या मूर्त्या महागल्याने नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी नवरात्रोत्सवातील इतर खर्चांवर हात आखडता घेतल्याचे पहावयास मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -